चोराने गिळलेली सोनसाखळी अखेर सापडली

चोरी करण्यासाठी राजस्थानहून थेट मुंबई गाठणारे चोरटे दाम्पत्य

चोराने गिळलेली सोनसाखळी अखेर सापडली

वांद्रे फेअर म्हणून ओळखल्या जाणारा वार्षिक माऊंट फेरी उत्सव यावर्षी ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत भरवला गेला होता. मात्र शनिवारी तीन वर्षाच्या मुलीच्या गळ्यातील तीन ग्राम वाजनाची सोनसाखळी एका जोडप्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरट्यानी पोलिसांपासून सोनसाखळी लपविण्याच्या भानगडीत त्यातील एकाने चक्क सोनसाखळी गिळून टाकली. वांद्रे पोलिसांनी चोरांपर्यंत पोहोचले असून चोराला सायन रुग्णालायत दाखल करून सोनसाखळी हस्तगत केली. या प्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

पकडण्यात आलेले दोघेही राजस्थान येथील दूधवाला गावचे रहिवासी आहेत. राकेश माळी (२३) आणि सीता माळी(२३) असे आरोपी जोडप्यांचे नाव आहे. ते मुंबईमध्ये वांद्रे येथील माऊंट मेरी येथील जत्रेमध्ये दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकांना टार्गेट करून सोन्याच्या चैन पाकीट व मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी हे जोडपे खास राजस्थानहून मुंबईला आले होते.

शनिवारी दुपारी फिल्वी नारकर या नालासोपऱ्याच्या रहिवासी असून त्यांच्या तीन वर्षाच्या तानियाला घेऊन आल्या होत्या. दर्शनासाठी चर्चच्या बाहेर रांग लावली असता सीताने तानियाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला आणि तिचा पती राकेशकडे सोनसाखळी सोपावली. त्याने सोनसाखळी तोंडात ठेवत पोलिसांच्या भीतीने नंतर गिळून टाकली.

हे ही वाचा:

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स

रतन टाटांच्या भेटीतून त्याला ‘कोटी कोटी’ आशीर्वाद

नालासोपाऱ्यातील रहिवासी फिल्वी याने पोलिस स्थानकात या घटने बद्दल माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम व एटीसी कर्मचारी यांनी आरोपींना पकडले. आरोपींची झडती घेतली असता सोनसाखळी सापडली नाही. पोलिसी हिसका दाखवत चोरांनी सोनसाखळी गिलळल्याचे कबूल केले. चोरा बद्दल हे समजताच पोलिसानी सायन रुग्णालायत दाखल केले. त्यानंतर रविवारी एन्डोस्कोपी करून आरोपी राकेश माळीच्या पोटातली सोनसाखळी बाहेर काढली. त्यानंतर पोलिसानी या दाम्पत्याला अटक केली.

Exit mobile version