वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेले धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगणाऱ्या निनावी फोनकॉल मुळे एकच खळबळ उडवून दिली होती, मात्र ही केवळ अफवा होती हे कळल्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांचा जीव भांड्यात पडला.
कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला असून तो गुजरात मध्ये राहणारा आहे. त्याने प्रसिद्धी मिळावी यासाठी धमकीचा कॉल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल हायस्कुलमध्ये मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून शाळेत बॉम्ब ठेवण्यात आला असून तो कुठल्याही क्षणी फुटेल असे बोलून फोन कट केला.
हे ही वाचा:
एटीएम मधून रोकड काढत आहात थांबा ?
मागचं सरकार फ़ेसबुकवरती होतं, पण जनतेत मृत होतं
मुश्रीफांचा नंबर लागला आता अस्लम शेख
विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवर कारवाई केली जात आहे…मुश्रीफांचा गंभीर आरोप
शाळा प्रशासनाने तात्काळ बीकेसी पोलिसांनी या निनावी कॉल संदर्भात सूचना दिली, बीकेसी पोलिसानी तात्काळ शाळेत धाव घेऊन बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकाला पाचारण केले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने संपूर्ण शाळा तपासली मात्र कुठलेही काही आक्षेपार्ह आणि संशयास्पद आढळून आलेले नाही.
त्यानंतर काही वेळाने फोन करणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर फोन करून त्याचे नाव विक्रम सिंह असून तो गुजरातचा रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच त्याने हा धमकीचा कॉल प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला होता, धमकीच्या कॉलमुळे पोलीस त्याला पकडतील आणि त्याचे फोटो आणि नाव प्रसारमाध्यमामध्ये छापून येईल आणि संपूर्ण देशात त्याचे नाव होईल म्हणून त्याने हा कॉल केला असल्याचे सांगून शाळेला खरे पटावे म्हणून त्याने स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड शाळेला शेअर केले अशी माहिती सूत्रांनी दिली.याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक गुजरात राज्यात रवाना झाले आहे.