पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून पित्याने ३ महिन्याच्या मुलीला उचलून जमिनीवर आपटून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना कुर्ला पश्चिम येथे घडली. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
परवेज सिद्दीकी (३४) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.कुर्ला पश्चिम एलआयजी कॉलनी येथे परवेज कुटूंबियासह राहण्यास आहे, परवेजला तीन मुली होत्या. एक पाच वर्षांची दानिया फातिमा दुसरी २ वर्षाची अमिना फातिमा आणि तिसरी ३ महिन्याची आफिया फातिमा अशा तीन मुली आहेत.परवेज हा कुठलाही कामधंदा करीत नव्हता, त्याचे कुटूंब त्याच्या भावावर अवलंबून होते. कामधंदा नसल्यामुळे पती पत्नीत सतत वाद होत होते.
हे ही वाचा:
भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीत अडकलेत!
पूर्व उपनगरातून ७ सराईत गुन्हेगार हद्दपार
लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडरची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या
समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!
शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परवेज आणि त्याची पत्नी सबा (२६) हे बेडरूम मध्ये होते, सबा ३ महिन्याची मुलगी आफियाला मांडीवर घेऊन झोपवत असताना परवेज आणि सबा यांच्यात कामधंद्यावरून वाद सुरू झाला, या वादात परवेजने पत्नी सबाला मारहाण करून पत्नीच्या मांडीवर असलेल्या ३ महिन्याच्या आफियाला परवेजने उचलून जमिनीवर जोरात आपटले, आणि घराबाहेर निघून गेला. यात गंभीर जखमी झालेल्या आफियाला सबा आणि कुटूंबियानी तात्काळ भाभा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलीसानी रुग्णालयात धाव घेऊन सबा हिचा जबाब नोंदवून परवेज विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे.