१२ वर्षीय बलात्कार पीडितेच्या वडिलांना फोटोवरून पटली ओळख!

पीडित मुलगी शाळेत परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती

१२ वर्षीय बलात्कार पीडितेच्या वडिलांना फोटोवरून पटली ओळख!

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेज दिसली होते.याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीचे छायाचित्र पाहिल्यानंतरच आम्हाला तिच्या स्थानाबद्दल माहिती मिळाली.

 

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बलात्कारानंतर सापडलेल्या १२ वर्षीय मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी तिच्या शाळेत सुरु असलेली परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती.माझ्या काकांनी मला एक व्हिडिओ दाखवला त्यामध्ये मुलगी रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत फिरत असल्याचे दिसत होते, त्यानंतर आम्हाला तिच्याबद्दल कळले, ते पुढे म्हणाले. पीडित कुटुंब मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात रहिवासी आहेत.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!

पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.तिची शाळा त्यांच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. २४ सप्टेंबरला ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती आणि बेपत्ता झाली, ते पुढे म्हणाले.ती परत घरी न आल्याने तिचा आम्ही सर्वत्र शोध घेतला.तिचा शोध न लागल्याने शेवटी आम्ही २५ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केल्याचे, मुलीच्या वडिलांनी सांगितले.माझ्या काकांनी मला तिचा फोटो दाखवला तेव्हा ती उज्जैनमध्ये असल्याचे कळून आल्याचे त्यानी सांगितले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आले की पीडित मुलगी अर्धनग्न आणि रक्तस्त्राव अस्वस्थेत उज्जैनच्या रस्त्यावरून चालताना दिसण्यापूर्वी ती मुलगी जीवन खेरी येथे एका ऑटोमध्ये बसली होती.या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आले होते.याप्रकरणी पोलिसांनी ऑटो चालकाला अटक केली असून अन्य तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version