अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटर प्रकरणी निर्णय

अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याच्या झालेल्या एन्काऊंटर नंतर त्याच्या कुटूंबियांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षयच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले असून अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या जीवालाही धोका, असल्याची भीती अक्षयच्या वडिलांची मुंबई हायकोर्टसमोर व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’

‘विनेश फोगटने रडगाणे सांगण्याऐवजी माफी मागायला हवी होती’

विलेपार्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना चोर समजून जबर मारहाण

दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

अक्षयच्या आईवडिलकडून पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर अक्षयच्या वडिलाकडून आपले म्हणणे मांडण्यात आले आहे.

तुम्ही रीतसर याचिका करा आम्ही तुमच म्हणणं ऐकून घेऊ अश्या सूचना न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी दिल्या आहेत. अक्षयच्या वडिलाकडून उद्याच यासंदर्भात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांच्यावतीने वकील अमित कटानवरे यांनी आज कोर्टासमोर ही माहिती दिली. बदलापूर येथे दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार प्रकरणी अक्षय हा मुख्य आरोपी होता.

सोमवारी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.

Exit mobile version