मुलुंडमधील धक्कादायक प्रकार; मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या 

मुलुंडमधील धक्कादायक प्रकार; मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या 

गतिमंद मुलाची पाण्याच्या पिंपात बुडवून हत्या केल्यानंतर पित्याचे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आली आली आहे. मुलगा गतिमंद असल्यामुळे माझ्यानंतर त्याचे भविष्यात काय होऊन या चिंतेतुन पित्याचे हे कठोर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वडिलांविरुद्ध  हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दशरथ भट्ट (६५) असे वडिलांचे नाव असून योगेश भट्ट (३५) असे मुलाचे नाव आहे. दशरथ हे पत्नी आणि मुलगा योगेश सोबत मुलुंड पश्चिम क्राऊन योगी हिल्स याठिकाणी राहण्यास होते. दशरथ यांना ३ मुली असून तिघींचा विवाह झाला असून त्या सासरी राहण्यास आहे. योगेश हा लहानपणासून गतिमंद असल्यामुळे आपल्या नंतर मुलाचे कसे होणार याची चिंता वडील दशरथ यांना लागली होती.

हे ही वाचा:

त्या भेटीचा अर्थ हाच की, पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय

धक्कादायक! कुटुंबातील पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

यूपीएला बाजुला ठेवत राष्ट्रमंच नावाची तिसरी आघाडी

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार

शनिवारी रात्री दशरथ हे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम घेऊन घरी आले. पत्नी आणि मुलाला त्यांनी आईस्क्रीम मध्ये गुंगीचे औषध देऊन खाण्यास दिले. मध्यरात्री दशरथ हे झोपेतून जागे झाले व त्यांनी पत्नी आणि मुलगा गाढ झोपेत असल्याचे बघून धान्य साठवतात तो पिंप बाहेर काढून त्यातील धान्य बाहेर काढले व पिंपात पाणी भरून गतिमंद मुलगा योगेश याला पिंपात बुडवून त्याची हत्या केली, त्यानंतर स्वतः बेडरूममध्ये असलेल्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. सकाळी पत्नीला शुद्ध येताच घरातील दृश्य बघून तिने आरडाओरड करून शेजाऱ्यापाजाऱ्याना मदतींसाठी बोलावून.

या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आली असून त्यात वडील यांनी मुलाच्या आजारासंदर्भात लिहून माझ्यानंतर त्याचे पुढे काय होणार या चिंतेतून मी त्याची हत्या करून स्वतः आयुष्य संपवत असल्याचे लिहिलेले असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी दिली आहे.

या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अपमृत्युची नोंद करण्यात आली असल्याचे भिसे यांनी सांगितले.

Exit mobile version