27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा'मराठा आरक्षणाचा बनाव रचत बापानेच केली मुलाची हत्या'

‘मराठा आरक्षणाचा बनाव रचत बापानेच केली मुलाची हत्या’

आरोपी बापाला अटक

Google News Follow

Related

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथे मराठा आरक्षणासाठी एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मागील फेब्रुवारी महिन्यात घडली होती.मात्र, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या नसून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.धक्कादायक म्हणजे या तरुणाची हत्या दुसरा कोणी नाही तर त्याच्या जन्मदात्या बापानेच केली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवप्रसाद थुटे असे मृत तरुणाचे नाव असून स्वतःच्या बापानेच त्याची हत्या केली आहे.महादेव थुटे असे आरोपी बापाचे नाव असून त्याने गळा दाबून आपल्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.आरोपी महादेव थुटे याचा आपल्या मुलाशी वाद झाला होता.या वादात आरोपी बापाने आपल्या मुलाची गळा दाबून हत्या केली.कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलाचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा बनाव रचत चिठ्ठी लिहून ठेवली.

हे ही वाचा:

पुढील आर्थिक वर्षात भारत दारुगोळा आयात करणे थांबवणार!

यंदाची निवडणूक ‘नरेंद्र मोदी’ विरुद्ध ‘राहुल गांधी’, ‘जिहाद’ विरुद्ध ‘विकास’

‘महानंद’ पाच वर्षांसाठी ‘मदर डेअरी’च्या ताब्यात; नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडून हस्तांतर

‘न्यायालयाला राजकीय लढाईचे व्यासपीठ होऊ देऊ नका’

दरम्यान, डॉक्टरांच्या शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तरुणाची आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघड झाले.डॉक्टरांच्या अहवालात तरुणाची गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले.या प्रकरणी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बापाने मुलाच्या हत्येची कबुली दिली.मुलाच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपी महादेव थुटे याला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा