सून आणि तिच्या माहेरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून ५० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चेंबूर येथील लालडोंगर येथे घडली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सून व तिच्या माहेरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवदत्त वाघमारे (५०) असे आत्महत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. देवदत्त हे हे पत्नी आणि पवन आणि प्रतीक या दोन मुलासह चेंबूर लालडोंगर परिसरात राहण्यास होते. देवदत्त हे रिक्षाचालावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काही वर्षांपूर्वी मोठा मुलगा पवन याचे पूजा या तरुणीशी लग्न झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून पूजा आणि पवन या पतिपत्नीत सतत कुठ्ल्यान कुठल्या कारणावरून वाद होत होता. दरम्यान, आई वडिलांनी तुम्ही भांडत असाल तर आमच्यासोबत राहू नका असे सांगितले होते. दरम्यान पूजा हिने सासऱ्याच्या विरोधात विनयभंग मारहाणीची तक्रार केली होती. तेव्हापासून देवदत्त हे तणावाखाली होते.
गुन्हा मागे घेण्यासाठी पूजा आणि तिचे माहेरचे लोक १५ लाख रुपये अथवा राहते घर पूजाच्या नावावर करावे अन्यथा पुन्हा खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी त्यांनी देवदत्त यांना दिली होती. मंगळवारी दुपारी घरात कोणीही नसताना तणावात असलेल्या देवदत्त यांनी सून आणि तिच्या माहेरच्या मंडळीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. देवदत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सून पूजा आणि तिच्या माहेरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूला सून आणि तिच्या माहेरचे लोक जबाबदार आहे असे लिहिले आहे.
हे ही वाचा:
भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान
ममता बॅनर्जींचे स्वागत आणि भाजपचे मुख्यमंत्री आले तर टीका
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
ममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार
चुनाभट्टी पोलिसांनी याप्रकरणी सून पूजा तिचे वडील अनिल म्हस्के,आई माधुरी,बहिण दिपा आणि भाऊ अक्षय म्हस्के यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.