25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामारेल्वेतील फटका गॅंगचे भयानक कृत्य; पाठलाग करणाऱ्या पोलिसाला दिले विषारी इंजेक्शन

रेल्वेतील फटका गॅंगचे भयानक कृत्य; पाठलाग करणाऱ्या पोलिसाला दिले विषारी इंजेक्शन

फटका गँगला अटक करण्यासाठी रेल्वे पोलिसांची ६ पथके

Google News Follow

Related

मुंबईतील रेल्वेमध्ये सक्रिय असणाऱ्या फटका गॅंगने एका पोलीस कॉन्स्टेबलचा बळी घेतला आहे. मोबाईल चोरून पळणाऱ्या फटका गँगच्या सदस्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई शहर पोलीस दलातील ३० वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला फटका गॅंगच्या इतर सदस्यांनी पकडून रुळामध्येच त्याला मारहाण करून विषारी द्रव्य असलेले इंजेक्शन टोचले. एवढ्यावर न थांबता या टोळीने कॉन्स्टेबलला लालसर रंगाचे औषध पाजून तेथून पळ काढला. या घटनेनंतर प्रकृती खालावल्याने बुधवारी या कॉन्स्टेबलचा ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून दादर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून फटका गँगच्या शोध घेण्यासाठी सहा पथके तयार केली असून या टोळीचा कसून शोध घेण्यात येत आहे.

विशाल पवार (३०) असे या दुर्दैवी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ठाण्यातील कोपरी येथे राहणारे विशाल पवार हे मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून २०१५मध्ये भरती झाले आहे. मूळचे चाळीसगाव येथे राहणारे पवार विवाहित आहे. रविवारी रात्रपाळीसाठी कर्तव्यावर निघालेले पवार हे सायन माटुंगा दरम्यान ट्रेनच्या दारात उभे राहून प्रवास करीत होते. सायन माटुंगा दरम्यान ट्रेन धीमी झाली होती. पवार हे मोबाईल फोनवर बोलत असताना फटका गॅंगने त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल फोन खाली पाडला. पडलेला मोबाईल घेऊन पळून जात असताना कॉन्स्टेबल पवार यांनी ट्रेन मधून उडी टाकून त्यांचा पाठलाग सुरू केला.

काही अंतरावर फटका गॅंगच्या सदस्यांनी कॉन्स्टेबल पवार यांना पकडून त्यांना मारहाण केली. एकाला त्याच्या पाठीवर विषारी द्रव्य असलेले इंजेक्शन टोचले, तेवढ्यावर न थांबता या टोळीने पवार याचे तोंड उघडून त्यात लालसर रंगाचे द्रव्य ओतले, काही वेळातच पवार यांची शुद्ध हरपली. त्यांना शुद्ध येताच कसेबसे आपले घर गाठले. सोमवारी कॉन्स्टेबल विशाल पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी त्यांची प्रकृती खालावली त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाच्या एसएसटी पथकाची कारवाई, कारमधून जप्त केले ३० लाख रुपये!

लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो का काढला?

लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित खासदार रेवण्णा १५ मेला भारतात येणार

गोल्डी ब्रार जिवंत आहे….

प्रथम हे प्रकरण ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा दादर रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फटका गँगला अटक करण्यासाठी रेल्वे पोलिसांची ६ विविध पथके तसेच मुंबई शहर पोलीस ठाण्याचे विविध पथके तयार करून फटका गँगचा शोध घेण्यात येत आहे.

३० वर्षीय विशाल पवार हे २०१५ मध्ये पोलिस खात्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील चाळीसगाव, जळगाव येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना मूलबाळ नव्हते. त्याची पत्नी गेल्या आठ दिवसांपासून नाशिक येथे तिच्या आईच्या घरी होती. पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गावी नेण्यात आले आहे, अशी माहिती दादर जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.डॉक्टरांनी अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केले नसून ते राखून ठेवले आहे, असेही कदम म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा