फारूक बाशा या धान्य व्यापाऱ्याने विम्याची ५० लाखांची रक्कम मिळवण्यासाठी एका हिंदू आणि मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील पामुलापाडू मंडल येथे १ एप्रिल रोजी घडली. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या माहितीनुसार, बाशा याच्यावर स्थानिक शेतकऱ्यांचे एक कोटीचे कर्ज होते. मात्र तो ते फेडू शकत नसल्याने त्याने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला.
आरोपीने चेलिमेल्ला गावातील सेट्टी प्रताप या मानसिकदृष्ट्या विकलांग हिंदू व्यक्तीला भुलवले. त्याने त्याला त्याच्या गोदामात आणले. या गोदामात डांबून हे गोदाम बाशाने पेटवून दिले. या आगीत प्रतापचा मृत्यू झाला. बाशाच्या कुटुंबानेही हा मृत्यूचा कट तडीस नेण्यासाठी त्याला मदत केली आणि ही आग एक दुर्घटना असल्याचा बनाव रचला. प्रतापला मारल्यानंतर बाशाच्या कुटुंबीयांनी पामुलापडू पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या गोदामात आग लागल्याचे कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह जप्त केला. कुटुंबानेही हा मृतदेह फारूक बाशाचा असल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह फारूक बाशाच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. त्यानंतर बाशाच्या कुटुंबीयांनी प्रताप या हिंदू पुरुषाचा मृतदेह दफन केला.
हे ही वाचा:
अवघ्या ५० रुपयांसाठी ग्राहकाने दुकानदाराच्या बोटाचा घेतला चावा!
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!
रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळीबार!
त्यानंतर घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच ४ एप्रिल रोजी पोलिसांना स्वरूपा नावाच्या महिलेची तक्रार आली. तिने तिचा पती १ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गोदामात सापडलेल्या फारूक बाशाचे कपडे तिला दाखवले. तिने हे कपडे तिच्या पतीचे असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी बाशा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, बाहशा हा हैदराबादमध्ये लपल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. विम्याचे ५० लाख रुपये मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली आहे.