संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

संगमनेर येथील कांदा व्यापाराने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. संगमनेर येथील कांदा व्यापरी मोबिन इस्माईल शेख आणि त्याची पत्नी सलमा शेख यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकोले न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.

संगमनेर मधील कुरणरोड येथील कांदा व्यापारी मुबीन इस्माईल शेख याने ‘रॉयल ट्रेडिंग कंपनी’ या नावाने कळस येथील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला. २०१९ च्या जून जुलै महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी या कंपनीला कांदा विकला. सुरुवातीला या कंपनीने शेतकऱ्यांना रोख पैसे दिल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या कंपनीवर बसला.

कालांतराने कंपनीने शेतकऱ्यांना धनादेश (चेक) देण्यास सुरुवात केली. हे धनादेश पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराने बँकेत टाका असे गोड बोलून सांगितले. मात्र, शेतकऱ्यांनी बँकेत धनादेश वटवण्याचा प्रयत्न केला असता कंपनीच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर असे दोन- तीन वेळा घडल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

हे ही वाचा:

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

त्यानंतर कळस येथील सखुबाई पुंजा वाकचौरे आणि जिजाबा जीवबा वाकचौरे यांनी वकील डी. एम. गवांदे तर रवी अशोक बिबवे यांनी वकील बी. जी. वैद्य यांच्या मार्फत अकोले न्यायालयात २०१९ मध्ये फिर्याद दाखल केली आहे. आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला असून भारतीय चलनक्षम कायदा कलम १३८ अन्वये अकोले न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोबिन शेख याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पुन्हा एकाही तारखेला हजर राहिलेला नाही. यामुळे अकोले न्यायालयाने मोबिन शेख व त्याला जामीन असणारी त्याची पत्नी सलमा मोबिन शेख व मॅनेजर सचिदानंद काकड यांचे अटक वॉरंट जारी केले आहे. यापूर्वीही दोन वेळा त्याने पोलिसांना हुलकावणी दिली असून पत्नी व तो एकत्र राहत असल्याचे आढळून आले होते.

“शेती माल बांधावर खरेदी करून व्यापारी हे शेतकऱ्यांनची फसवणूक करत आहेत. मोबिन शेख याने अनेकांचे पैसे बुडवले असून तो नाव बदलून मोबिन चौधरी नावाने पुन्हा फसवणूक करत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पुराव्यासहित संपर्क साधावा. या आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे,” असे आवाहन कळस गावचे भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version