28 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरक्राईमनामामहाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Google News Follow

Related

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ध्वजारोहण करत असतानाच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मंत्रालयात परिसरातील सुरक्षा व्यवस्थेने प्रसंगावधान दाखवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण तरीही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला आत्मदहन करावेसे वाटणे ही एक लाजिरवाणी घटना असल्याचे म्हटले जाते आहे.

आज भारतभर जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही शासकीय यंत्रणा, तसेच खासगी, सामाजिक संस्थांमार्फत झेंडावंदनाचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्याच्या मंत्रालयात झेंडावंदन पार पडले. पण त्याच वेळी मंत्रालयाबाहेर जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपता क्षणी या शेतकऱ्यानी मंत्रालयाच्या गेटवरच अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’

पण मंत्रालय आवारात उपस्थित असलेल्या मंत्रालय पोलीस आणि मरीन लाईन पोलीसांनी प्रसंगावधान दाखवून त्या शेतकऱ्याला यशस्वीपणे थांबवले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले नाही. सध्या हा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान या शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा आधीपासूनच दिला असल्याची माहिती मिळत आहे. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव असल्याचे समजते तू जळगावचा रहिवासी आहे. जळगाव पोलीस प्रशासनाने आपल्या तक्रारीत आर्थिक तडजोड करून एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे पोलीसांच्या या नाकर्तेपणाला कंटाळून आपण १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा या शेतकऱ्याने आधीच दिला होता अशी माहिती मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा