मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोरवाल हे दक्षिण मुंबईतील भायखळा येथे राहत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
पारस पोरवाल यांनी मुंबईतील भायखळा येथील घराच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिक पोरवाल यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण शोधण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य मुंबईतील काळाचौकी भागात ही घटना घडली आहे.
पोरवाल ग्रुप या नावाने प्रसिद्ध असलेले मुंबईतील बांधकाम उद्योगातील मोठे व्यक्तिमत्व पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पोरवाल बिल्डर अँड डेव्हलपर्स ग्रुप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचे ते संचालक होते. त्यांनी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोरवाल यांच्याकडे कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही असे पोलिसांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
पोरवाल हे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक होते. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून बिल्डर आणि डेव्हलपर्समध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून, नातेवाईक आणि मित्रांकडून आत्महत्येमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.