मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या करणाऱ्या सलमान खान प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी सलमान खान आणि संबंधित तपास यंत्रणाच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मृत आरोपीच्या कुटुंबांनी शनिवारी मृतदेह ताब्यात घेऊन पंजाबला रवाना झाले आहे.
अनुज थापन असे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.अनुज आणि त्याचा सहकारी सोनू चंदर यांना मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने गेल्या आठवड्यात सलमान खान गोळीबार प्रकरणात मुख्य हल्लेखोरांना शस्त्र पुरवठा केल्या प्रकरणी अटक केली होती.
अनुज आणि इतर दोन जणांना ८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबई पोलीस मुख्यालयात असणाऱ्या पोलीस कोठडीत या तिघांची रवानगी करण्यात आली होती.
१ मे रोजी अनुप थापन याने पोलीस कोठडीतील शोचालयात चादरीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
अनुज च्या आत्महत्येची माहिती मिळताच अनुजचे पंजाब मध्ये राहणारे कुटुंब शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते, अनुज याने आत्महत्या संशयास्पद असल्याचा आरोप करून कुटुंबांनी या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
हे ही वाचा:
‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’
पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत!
वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
शनिवारी अनुजच्या कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलामार्फत अनुज आत्महत्या प्रकरणात याचिका दाखल केली होती.त याचिकेत अनुज याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसेच हे प्रकरणी राज्य सीआयडी कडून काढून सीबीआयकडे तपासासाठी देण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
अनुजच्या कुटुंबाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संबंधित तपास यंत्रणेला प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी कुटुंबांनी अनुज याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंजाब येथे रवाना झाले आहे.