चोरी केल्याच्या संशयावरून कुटुंबाला बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

चोरी केल्याच्या संशयावरून कुटुंबाला बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गावात जमावाने एका कुटुंबाचा पाठलाग करून बेदम मारहाण केली आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. जमावाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतं आहे.

सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातील किल्लानूर गावाजवळ मंदिरात चोरी करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर जमावाने या कुटुंबावर पाळत ठेवली. पुढे हे सहा लोकांचे कुटुंब रिक्षातून प्रवास करताना दिसल्यावर, गावकऱ्यांच्या टोळीनं ते दरोडेखोर असल्याचा दावा करत वाहनाचा पाठलाग सुरू केला. जमावाने रिक्षाला घेराव घातला आणि माचुवाडीजवळ थांबवून कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पुढे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या कुटुंबाची सुटका केली. या कुटुंबाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कुटुंबातील एका लहान मुलीचा काल संध्याकाळी मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : 

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलन पेटलेलेच; गोळीबारात दोन महिला मृत्युमुखी

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

कमाल झाली! राहुल गांधींच्या विचारांशी सहमत नाही, पण स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेससोबत!

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

मुलीच्या मृत्यूनंतर तिची आई लिली पुष्पा यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आम्ही कुटुंबासह दोन महिन्यांपूर्वी रिक्षाने कुड्डालोरला अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी निघालो होतो. दरम्यान, १४ नोव्हेंबरला किल्लानूरजवळ तिघांनी आमच्याशी भांडण केलं. त्यानंतर पती सत्यनारायणसामी यांनी मध्यस्थी केल्यावर त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या गटाने पाठलाग सुरू केल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे.

Exit mobile version