अमित शहा, नितीन गडकरी यांच्या नावाने लस प्रमाणपत्र  

अमित शहा, नितीन गडकरी यांच्या नावाने लस प्रमाणपत्र  

उत्तर प्रदेशमधील इटवाह जिल्ह्यातून लसीकरण संदर्भातील एक अजब घोटाळा समोर आला आहे. काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावे लस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रमाणपत्रांवरील मंत्र्यांच्या नावांची इंग्रजी स्पेलिंग चुकली आहे. इटवाह जिल्ह्यातील टाखा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं ही फेक सर्टिफिकेट्स असल्याचं स्पष्ट केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

लस प्रमाणपत्रावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी केंद्रीय मंत्र्यांची नावे असून इंग्रजी स्पेलिंग चुकीची आहेत.

हे ही वाचा:

‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’

‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

विशेष म्हणजे या प्रमाणपत्रांवर अमित शाह यांचे नाव Amit Sha तर प्रमाणपत्रावर वय ३३ वर्षे नमूद करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांचे नाव Niten Gadkar आणि वय ३० वर्षे लिहिण्यात आले आहे. पियूष गोयल यांचे नाव Pushyu Goyal आणि वय ३७ वर्षे नमूद करण्यात आले आहे. ओम बिर्ला यांचे वय २६ वर्षे दाखवण्यात आले आहे. प्रमाणपत्रावर नावे असलेल्या सर्वांनी आपला पहिला डोस १२ डिसेंबर रोजी इटवाह इथल्या एका कम्युनिटी लसीकरण केंद्रावरुन घेतल्याचे लिहिले आहे. तर दुसऱ्या डोसची तारीख ५ मार्च २०२२ ते ३ एप्रिल २०२२ अशी लिहिण्यात आली आहे.

Exit mobile version