32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामापुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

छापेमारीनंतर ३७८८ सिम कार्ड, सात सिम बॉक्स जप्त

Google News Follow

Related

काही महिन्यांपासून पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत इसिसी मॉड्यूलचा पर्दाफार्श केला होता. यानंतर आता गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. याचं पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकत बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. याला कोणताही परवानगी घेण्यात आली नव्हती. या परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. एटीएसच्या छाप्यात तब्बल ३७८८ सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु असल्याची गुप्त माहिती एटीएसच्या हाती लागली होती. यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा..

गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी

हिंदू धार्मिक चिन्हे असलेले विजेचे खांब हटवण्याचे आदेश

बांगलादेशात जमात-ए-इस्लामी, इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली

आसामला धमकावण्याची हिंमत कशी केली ?

पुण्यातील कोंढवा परिसर हा काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. या भागात दहशतवादी राहत होते. मोटारसायकल चोरी प्रकरणात ही धक्कादायक बाब उघड झाली. पुढे या प्रकरणाचे बरेच तपशील समोर आले. तसेच अनेक जणांना अटक देखील करण्यात आली. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षणही हे दहशतवादी घेत असल्याची बाब समोर आली होती. यानंतर आता बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर वरील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा