घाटकोपर मध्ये तोतया पोलिसांनी तीन माणसांना फसवले. ही धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली आणि या तोतया पोलिसांनी या तिघांकडून २२ लाख लंपास केले. अजून तरी हे गुन्हेगार फरार आहेत परंतु ह्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
शशिकांत डागळे, सुशील तलेले आणि दिलीप जाधव असे तक्रारदारांची नवा आहेत. शशिकांत आणि सुशील हे दोघे मिळून एक संस्था चालवत होते. ह्या संस्थेचे नाव मंजुलधारा शिक्षण आणि सामाजिक संस्था असे आहे. ह्या संस्थेसाठी ह्या दोघांनी एक जागा पाहिली होती. ती जागा विकत घेण्यासाठी त्यांनी २२ लाख रोख रक्कम गोळा केली. पण ती रक्कम त्यांना त्यांच्या संस्थेच्या बँकेत ठेवायची होती. म्हणूनच दोघांनी दिलीप जाधव ह्यांना संपर्क केला. दिलीपने ह्या दोघांना अमित नावाच्या माणसाचा नंबर दिला जो ह्यांना ही रक्कम बँकेत ठेवण्यासाठी मदत करणार होता. १४ नोव्हेंबर रोजी अमित ने दोघांना आमिर म्हणून एका माणसाची ओळख करून दिली आणि सांगितले की २५ नोव्हेंबरला घाटकोपर येथे २२ लाख रोख रक्कम घेऊन या.
हे ही वाचा :
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल
पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!
शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!
सांगितल्या प्रमाणे शशिकांत आणि सुशील २२ लाख रुपये रोख रक्कम आणि कागदपत्र घेऊन घाटकोपरला पोहोचले. आमिरची वाट पाहत असताना दोघांना तिथे दोन पोलीस रिक्षामध्ये आल्याचे दिसले. पोलिसांना पाहून ही दोघं घाबरली. “पोलीस आपल्याला काळा पैसे वाले गुन्हेगार समजून अटक करतील’ ह्या विचाराने त्यांचा थरकाप उठला. ते दोन पोलीस रिक्षातून उतरले आणि ह्यांच्या पैशाच्या बॅगेसकट त्यांचे फोन जप्त करून घेऊन गेले. ह्या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे चौकशी केली. चौकशीतून हे कळण्यातआले की रिक्षात आलेले व्यक्त हे तोतया पोलीस होते