मुंबईत एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सिगरेट ठेवण्याच्या बहाण्याने हा तोतया पोलीस पान दुकानांना लक्ष्य करायचा. सिगरेट ठेवण्याच्या बहाण्याने पानवाल्यांकडून पैसे उकळायचा. पोलिसांना त्याचा संशय आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली कैलास खामकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी खामकरला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलीस ओळखपत्र आणि विदेशी सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय होता. या आधारे चौकशी केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. त्याने सांगितले की, हा बनावट पोलीस अधिकारी साकीनाका येथील पानाच्या दुकानदाराला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला त्याच्यावर संशय आला. त्याआधारे त्याची चौकशी केली असता तो बनावट पोलीस असल्याचे उघड झाले.
हे ही वाचा:
बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे दाखल
सावरकरांबद्दल काँग्रेसकडून पुन्हा अभद्र टिप्पणी, उद्धव ठाकरे काय करणार?
मुंबईत अतिरेकी शिरल्याचा फोन त्याने भावाला त्रास देण्यासाठी केला…
आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!
त्यानंतर धडक कारवाई करत पोलिसांनी खामकरला बेड्या घातल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ओळखपत्र जप्त केले आहे. त्याच्याकडून मुंबईतील एका पोलीस ठाण्याचा बनावट पोलीस ओळखपत्र जप्त करण्यात आला आहे. या आयडीचा वापर करून तो सुपारी दुकान मालकांना धमकावून पैसे उकळायचा. आरोपी दीर्घकाळ अशा पान दुकानांना लक्ष्य करत होता. सध्या पोलिसांनी त्याला वाहनासह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.