30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामाखासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत बडेमियाँची २०० प्लेट बिर्याणी...

खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत बडेमियाँची २०० प्लेट बिर्याणी केली फस्त

एका तरुणाला केली गेली अटक

Google News Follow

Related

खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बडेमियाँची २०० प्लेट बिर्याणी फस्त करणाऱ्या एकाला काळाचौकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.अटक करणाऱ्या तरुणाने केवळ बिर्याणीच नाही तर बडेमियाँ हॉटेल मालकाच्या मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्याचा नावाखाली १० लाख रुपये उकळण्यात आले होते.अटक आरोपी हा लालबाग परिसरात राहणारा असून त्याने खासदार अरविंद सावंत यांचा खाजगी सचिव असल्याचे सांगून बडेमियाँच्या मालकाला चुना लावला.

सुरज कलव (३०)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, करीरोड येथे राहणारा सूरज याच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन गुन्हे विक्रोळीत एक आणि काळाचौकी येथे एक गुन्हा असे पाच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच सूरजचा माग घेऊन त्याला मंगळवारी अटक केली आहे.

कुलाब्यातील नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बडेमियाँ या हॉटेलचे मालक मोहम्मद शेख यांना गेल्या महिन्यात सूरज याने कॉल करून शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून २०० प्लेट बिर्याणी आणि गुलाबजामची ऑर्डर दिली होती, सावंत हे बडेमियाँमधून नेहमी खाद्य पदार्थ मागवत असल्यामुळे तसेच खाद्य पदार्थाचे बिल वेळेवर चुकवत असल्यामुळे शेख यांनी २०० प्लेट बिर्याणी आणि गुलाबजामची ऑर्डर सूरजने दिलेल्या करिरोड येथील पत्यावर पाठवली, या सर्वाचे बिल एकत्र देण्यात येईल असे सुरजने शेख यांना सांगितले.

दरम्यान सूरज ने पुन्हा कॉल करून ४० प्लेट बिर्याणीची ऑर्डर शेख यांना दिली, ती ऑर्डर देखील शेख यांनी पूर्ण केली. दरम्यान शेख यांच्या मुलीला चर्चगेट येथे लॉ कॉलेज ला ऍडमिशन हवे असल्यामुळे शेख यांनी सूरजला फोन करून साहेबांना तेवढ ऍडमिशनचे सांगा ना अशी विनंती केली.सुरजने ऍडमिशन होऊन जाईल असे आश्वासन देवून ऍडमिशनच्या नावाखाली वेळोवेळी शेख यांच्याकडून १० लाख उकळले होते.

हे ही वाचा:

‘चित्रगंगा’च्या माध्यमातून जगदीश खेबुडकरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्याची संधी

उद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला सुनावले

मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी प्रथम खात्री करून सूरज याचा सावंत याच्याशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले, दरम्यान काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०४ (लोकसेवक म्हणून), ३१६(२) (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काळाचौकी पोलिसांनी सूरज कलव याला करीरोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत खासदार अरविंद सावंत सोबत काहीही सबंध नाही, तसेच त्याने ऑर्डर केलेली २०० प्लेट बिर्याणी आणि गुलाबजाम हे मित्राच्या मुलाच्या वाढदिवसासाठी मागवून मित्राकडून त्याचे पैसे घेतले होते, तसेच इतर ४० प्लेट त्याने मित्रांना पार्टीसाठी मागवले होते अशी माहिती समोर आली आहे.सूरज नावाचा आपला कोणीही स्वीय सहाय्यक नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संबंधित व्यक्तीला अटक करावी, असे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा