मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस

नोटीसला प्रतिसाद देऊ नका पोलीस आयुक्तांचे आवाहन

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस

मुंबईतील लोकांना ईमेल, व्हाट्सअँप अकाउंटवर मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावाने अटकेच्या नोटीस येत आहे, मात्र या नोटीस बोगस असून मुंबई पोलिसांकडून या प्रकारच्या नोटीस देण्यात आलेल्या नसून लोकांना या नोटीसीला प्रतिसाद देऊ नये आणि यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात यावी असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ट्विटर हँडल वर केले आहे.

मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे, मुंबईतील काही लोकांना ईमेल ,व्हॉटसअँप वर मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावाचा उल्लेख असणारी अटकेची नोटीस पाठवली जात आहे. या नोटीसमध्ये सीबीआय सायबर क्राईम स्पेशल युनिटचा उल्लेख करण्यात आलेला असून कथित न्यायालयाचा आधार घेऊन ही नोटीस पाठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे, तसेच अल्पवयीन मुलाच्या पोर्नोग्राफी मुव्हीज संदर्भात ही नोटीस जारी करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले असून या आधारावर, कोणत्याही पीडित व्यक्तीसाठी जाणीवपूर्वक किंवा जाणीवपूर्वक किशोरवयीन पोर्नोग्राफिक साइट्सना डिजिटलरित्या कॅप्चर केल्याशिवाय भेट देणे अत्यंत कठीण आहे. तुमचा प्रतिसाद २४ तासांच्या आत मिळाल्यावर तुम्हाला न्यायालयाच्या आदेशावरील अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण उपलब्ध केले जाईल; आमचे कार्यालय २४ तास / ७ दिवस चालते. खात्री बाळगा की तुमच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.

हा प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात येताच मुंबई पोलिसांकडून या नोटीसीचे खंडन करण्यात आले असून ही नोटीस बोगस असून मुंबई पोलिसकडून अशा प्रकारची नोटीस कुठल्याही व्यक्तीला जारी करण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी त्याला बळी पडू नये व या नोटीसला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

पश्चिम बंगालमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर टाकला ‘लोखंडी पत्रा’

प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांचा अपमान; ज्ञानेश महारावविरोधात राजगुरूनगरमध्ये आंदोलन

केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

तसेच मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नागरिकांना आवाहन केले असून नोटीसीचे खंडन करण्यात आले आहे, ही नोटीस बनावट असून या प्रकारची नोटीस मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेली नाही, बनावट अटकेच्या सूचनेवर लोकांनी विश्वास ठेवू नका किंवा या नोटीसीला प्रतिसाद देऊ नका, तसेच नागरिकांनी या संदेशांना बळी न पडता त्वरित आम्हाला कळवावे असे आवाहन खुद्द मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘ट्विटर वर केले आहे.

Exit mobile version