गुजरातमधील सूरतमध्ये २.५७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, चारही आरोपी महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. शनिवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी सरोली येथे चार आरोपी तीन बॅग घेऊन पायी जात असताना त्यांना चेकपोस्टवर पकडण्यात आले.
सरोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे ४३ बंडल लपवले होते, प्रत्येक बंडलमध्ये एक हजार नोटा होत्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी, या बंडलांच्या वरच्या आणि खालच्या नोटा खऱ्या होत्या. “याशिवाय असे २१ बंडलही जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी २०० रुपयांच्या एक हजार नोटा होत्या. या नोटांच्या माध्यमातून बँका, मार्केट इत्यादींमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा त्यांचा डाव होता.”
हे ही वाचा :
सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा
तबल्याचा ताल हरपला; उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड
“विरोधकांनी ईव्हीएम विरोधातील आंदोलन लोकसभेच्या निकालानंतर केलं असतं तर त्याला अर्थ होता”
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सरकारचा नाही, अध्यक्षांचा
दत्तात्रेय रोकडे, राहुल विश्वकर्मा आणि राहुल काळे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि गुलशन गुगळे (सुरत ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२) (फसवणूक), ६१ (गुन्हेगारी कट) आणि ६२ (गंभीर गुन्हा करण्याच्या प्रयत्नासाठी शिक्षा) अंतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.