बनावट नोटांच्या साठ्यासह नऊ आरोपींना अटक

आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरु

बनावट नोटांच्या साठ्यासह नऊ आरोपींना अटक

औरंगाबादच्या औढा नागनाथ पोलीस पथकाने सुमारे एक कोटी १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील आत्तापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून आणखी दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे आहे कि , औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड, आणि लातूर येथील राहणारे केशव वाघमारे, सोमनाथ दाबके, सुनील जगवार , विनोद शिंदे, आणि केशव वाघमारे अशा पांच जणांशी एका संस्थे मार्फत ओळख झाली होती. या सर्व लोकांनी त्या महिलेला एका लाख रुपये देण्याऐवजी तीन लाख रुपये देऊन फसवणूक केली. यामुळे तिचा लोभ वाढला.

एक फेब्रुवारी रोजी हीच महिला दहा लाख रुपये घेऊन औंढा नागनाथ इथल्या उपबाजार समितीच्या आवारात पोचली. त्यानंतर खामगाव येथील एका गाडीमध्ये पाचजणांनी सुमारे ४० लाखाच्या बनावट नोटा घेऊन औंढा नागनाथ उपबाजार समितीच्या आवारात पोचले . या लोकांनी त्या महिलेकडून दहा लाखाच्या खऱ्या मूळ नोटा घेतल्या आणि त्या बदल्यात त्यांनी तिला चाळीस लाखाच्या बनावट नोटांची पिशवी घेतली. यानंतर आरोपीनी नोटा मोजायला सुरवात केली त्यावेळेस ती महिला गाडीबाहेर उभी होती. त्याचवेळेस नागनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली स निरीक्षक विशवनाथ झुंजारे आपल्या पूर्ण पथकासह तिथे पोचले.

घटनास्थळावरून त्या महिलेने पोलिसांना बघताच तिची घाबरगुंडी उडाली. त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला. आणि त्यांनी त्वरित तिची चौकशी सुरु केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्या ,महिलेने संपूर्ण हकीकतच त्यांना सांगितली. यानंतर त्वरित पोलीस पथकाने या महिलेसह आणखी त्या पाच आरोपींना पोलीस ठाण्यात नेले. आणि सर्व बनावट नोटा जप्त केल्या. त्याचवेळेस विदर्भ आणि मराठवाड्यतील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी नाकेबंदी केली.

हे ही वाचा:

मतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय

पुण्यातील कोयता गँगचा ‘आधार’च काढून घेणार

भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला पाच कोटींचा चेक

एकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार…

त्यानंतर पोलीस पथक खाम गावला रवाना झाल्यावर त्यांनी ज्ञानप्रकाश परमेश्वर, जांगीड लखन, गोपाळ बजाज, या आणखी तीन आरोपींना अटक केली. तर राहुल चंदू सिंग ठाकूर याला हि नंतर अटक करण्यात आली. याव्यतिरिक्त आणखी एक आरोपी खामगाव येथूनच पोलिसाना सापडला आहे अद्याप त्याचे नाव कळू शकले नाही. पोलिसानी या प्रकरणात एकूण ७५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तर अजून दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फरार आहेत आत्तापर्यंत औरंगाबाद पोलिसांना हे मोठे यश मिळाले असून , पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Exit mobile version