मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!

मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!

प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावे फेक अकाऊंट तयार करून पैसे उकळण्याचे गुन्हे अनेकवेळा नोंदविले जातात आणि त्याअंतर्गत अनेकांना आतापर्यंत पकडण्यात आले आहे, पैसे वसूल करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावानेच आता फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

मी सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असून मला कोलेजियमच्या बैठकीसाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीने पोहोचायचे आहे. मी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे अडकलो आहे. मला टॅक्सीसाठी ५०० रुपये पाठवाल का? मी न्यायालयात पोहोचलो की पैसे पाठवतो, असा एक संदेश सोशल मीडियावर फिरत होता.

एक्स या ट्विटर हँडलवर ही पोस्ट व्हायरल होत असून दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटकडे यासंदर्भातील तक्रार नोंदविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे, त्यांनी आपण कॅनॉट प्लेस येथे अडकलो आहोत, असे म्हणत लोकांकडून ५०० रुपयांची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?

शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !

डॉक्टर बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक !

लव्ह जिहादच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय द्या!

सर्वोच्च न्यायालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली आहे. त्यासंदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने खोटे अकाऊंट बनवून त्याद्वारे पैसे उकळले जात असतात. अनेकांना आजकाल ऑनलाइन मेसेजेस पाठवूनही पैसे मागितले जातात. आर्टिफिशियन इंटेलिजन्सच्या माध्यमातूनही पैसे उकळण्याचे प्रयोग झालेले आहेत. सध्याच्या काळात अशा सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. तेव्हा नागरिकांनी यासंदर्भात सावध राहण्याचे आवाहन वारंवार पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत असते.

 

Exit mobile version