31 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरक्राईमनामाबनावटी अधिकाऱ्याचा खेळ फसला

बनावटी अधिकाऱ्याचा खेळ फसला

सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊन हा ह्या माणसाने थेट बिल्डिंगचा आठवा माळा गाठला. पण अजून हा आरोपी पोलिसाच्या तावडीत आलेला नाही.

Google News Follow

Related

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात एका माणसाने पालिका अधिकारी असल्याचा बनाव रचून बांधकाम विकासक राकेश जैनच्या पत्नी मंजू जैन ह्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊन हा ह्या माणसाने थेट बिल्डिंगचा आठवा माळा गाठला. पण अजून हा आरोपी पोलिसाच्या तावडीत आलेला नाही.

त्यांनी फ्लॅटचा दरवाजा ठोकला. मंजू जैन ह्यांनी दरवाजा उघडला आणि पालिकेचा अधिकारी असल्याचे कळताच त्यांनी त्याला आत घेतले. त्या माणसाच्या अनुसार फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची माहिती बीएमसीला न दिल्याने मालकाचा तो शोध घेत असल्याचा दावा त्यानं केला. वेळ पाहताच त्याने मंजू ह्यांची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चोरी करण्यात अयशस्वी ठरला अँड तिथून तो पळून गेला. घडलेल्या घटनेची एफआयआर ओशिवरा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

“राकेश जैन ह्यांच्या फ्लॅटचे नूतनीकरण होत असल्याने मंजू आणि तिची घरकामगार शेजारील फ्लॅटमध्ये राहत आहेत. ही घटना नुकतीच दुपारी चारच्या सुमारास घडली. सोसायटीकडून परवानगी मिळाल्यानंतर पीडितेच्या घरी काम केले जात आहे. ज्याला याची माहिती असेल त्यांनी आरोपीला माहिती दिली असेल”, असे ओशिवरा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “त्याने मला ढकलले आणि माझी सोनसाखळी लुटण्याचा प्रयत्न केला. काही कारणांमुळे तो अयशस्वी झाला आणि झटपट पळून गेला. मी माझ्या पतीला फोन केला आणि हा घटनाक्रम सांगितला, तेव्हा त्यांनी मला सावध राहण्यास सांगितले कारण त्यांनी माहिती काढल्यानंतर हे कळण्यात आले की अक्षय धोत्रे नावाचा कोणी अधिकारी के-पूर्व प्रभागात नाही आहे,” असे मंजू यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा