शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

छत्तीसगडमधून ठोकल्या बेड्या

शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याला काही दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेर शाहरुख खान याला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. फैजल खान असे या आरोपीचे नाव आहे.

गेल्या आठवड्यात वांद्रे पोलीस ठाण्याला शाहरुख खानच्या नावे धमकीचा संदेश मिळाला होता. यानंतर या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की धमकीचा संदेश हा फैजान खान नावाच्या एका फोन नंबरवरून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी फैजान खान नावाच्या व्यक्तीची चौकशी केली असता २ नोव्हेंबरला आपला फोन चोरीला गेल्याचा दावा त्याने केला होता.

या प्रकरणी शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक छत्तीसगढच्या रायपुरमध्ये दाखल झाले होते. अखेर ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या फैजल खानला त्याच्या रायपूर येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. फैजल खानने यापूर्वी १४ नोव्हेंबरला मुंबईत येऊन वांद्रे पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्याला अनेक धमक्या येत असल्याने त्याने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेचा हवाला देत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशी मुलींना हिंदू नावाने आधारकार्ड, ईडीची झारखंड, प. बंगालमध्ये छापे

नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान

राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…

प्रकरण काय?

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली होती. दरम्यान, अभिनेता सलमान खान याला वारंवार बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी मिळत असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. शाहरुख खानला मिळालेल्या धमकीनंतर खळबळ उडाली होती. वांद्रे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होते. वांद्रे पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता तो छत्तीसगडच्या रायपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लोकेशनच्या आधारे छापा टाकला असता फैजान खान सापडला.

Exit mobile version