बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वकील फैजान खान याच्याकडे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, फैजान खान याने शाहरुख आणि आर्यन खान यांची सविस्तर माहिती गोळा केली होती. फैजान खानकडून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोनमधून ही माहिती समोर आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. फैजान खान याने ७ नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यातील दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून शाहरुख खानला धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती, दरम्यान वांद्रे पोलिसांनी फैजान खान याला रायपूर येथून अटक करण्यात आली होती.
वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या मोबाइल फोनवरून शाहरुखच्या सुरक्षेशी संबंधित आणि आर्यन खानशी संबंधित तपशीलवार मिळवला होता, मात्र, ही माहिती त्याने का गोळा केली याचे समाधानकारक उत्तरे आरोपी देऊ शकला नाही. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी जस्ट डायलवरून वांद्रे पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक मिळवला आणि नंतर धमकीचा कॉल केला होता.
हे ही वाचा:
मतांचा वाढलेला टक्का काय सांगतो?
काँग्रेस नेते नसीम खान यांची दोन व्यक्तींनी केली रेकी
युवराज म्हणतात, अदानींना अटक करा!
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची घसरण
अधिक तपासात समोर आले की धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन कॉलच्या एक आठवडा आधी ३० ऑक्टोबर रोजी खरेदी केला होता. फैजान खानने हा मोबाईल स्वतः विकत घेतला होता आणि त्यात त्याचे जुने सिमकार्ड वापरले होते. २ नोव्हेंबर रोजी फोन चोरीला गेल्याची तक्रार त्याने दाखल केली असली तरी त्यांनी सिमकार्ड निष्क्रिय केले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर फोन खरोखरच चोरीला गेला असता, तर चोराने सिमकार्ड बदलले असते, परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. शिवाय फोन चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर त्या क्रमांकावर कॉल करूनही आरोपीने फोन ट्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
फोन विकत घेतल्यानंतर आरोपीने त्यावरून अनेक कॉल केल्याचे कॉल रेकॉर्डवरून दिसून येते. 31 ऑक्टोबर रोजी, त्याने रात्री 11:27 वाजता 107 सेकंद, रात्री 11:30 वाजता 125 सेकंद आणि रात्री 11:53 वाजता 38 सेकंद कॉल केले. 1 नोव्हेंबर रोजी, त्याने दुपारी 2:24 वाजता 379 सेकंद, दुपारी 2:57 वाजता 69 सेकंद, दुपारी 3:00 वाजता 395 सेकंद आणि रात्री 9:22 वाजता 157 सेकंदांपर्यंत कॉल केले. या कॉल्स दरम्यान तो कोणासोबत बोलत होता याचे कोणतेही स्पष्टीकरण आरोपीने दिलेले नाही. गुन्ह्यात वापरलेला फोन आरोपीने मुद्दाम लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी गुन्ह्याची अगोदरच योजना आखली होती आणि त्यानुसार तो अंमलात आणल्याचेही तपासात समोर आले आहे.