दाऊद टोळीतील गँगस्टर फहीम मचमच मृत्युमुखी

दाऊद टोळीतील गँगस्टर फहीम मचमच मृत्युमुखी

दाऊद टोळीतील गँगस्टर फहीम मचमच याचा पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोविडने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. फहीम मचमच हा मागील काही वर्षांपासून दाऊद आणि छोटा शकील सोबत राहण्यास राहत होता असा अनेकांचा दावा आहे.
मात्र छोटा शकील याने केलेल्या दाव्या नुसार फहिम मचमच याचा मृत्यू हृदयविकाराने दक्षिण आफ्रिकेत झाला आहे.

फहिम मचमच याच्याविरुद्ध मुंबईत खून, खंडण्या यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून दिल्लीत देखील त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फहिम मचमच हा दाऊद आणि छोटा शकील याचा विश्वासू आणि निष्ठावंत होता. फहिम याच्या मृत्यूचे वृत्त आमच्यापर्यंत आले असले तरी अद्याप कोणीही याचा अधिकृत खुलासा केला नाही.

एकेकाळी कुख्यात खंडणीखोर छोटा शकीलच्या इशाऱ्यावर मुंबईत गुन्हेगारी कारवाया करणारा फहिम मचमच याने दाऊदच्या नाराजी नंतर मुंबईत स्वतःची टोळी उभी केल्याचे वृत्त होते. परदेशात बसलेल्या फहिमने मागील काही वर्षांपासून मुंबईतील व्यवसायिक, बिल्डर यांना खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली होती. घाटकोपर येथील एका बिल्डरकडे फहिम मचमचने ५० लाख रुपयांची खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !

मुंबईवर नामुष्की; ओमानने जिंकली मालिका

संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

छोटा शकील याचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जाणारा फहिम मचमच याने मागील काही वर्षांपासून मुंबईत हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये फहिम मचमच याच्या चार गुंडांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. यामध्ये कुख्यात गुंड फजरू रहेमान खान याचा समावेश होता. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

Exit mobile version