26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामामुंबईत फहिमची 'मचमच' वाढली; निशाण्यावर व्यवसायिक आणि बिल्डर

मुंबईत फहिमची ‘मचमच’ वाढली; निशाण्यावर व्यवसायिक आणि बिल्डर

Google News Follow

Related

एकेकाळी कुख्यात खंडणीखोर छोटा शकीलच्या इशाऱ्यावर मुंबईत गुन्हेगारी कारवाया करणारा फहिम मचमच याने दाऊदच्या नाराजी नंतर मुंबईत स्वतःची टोळी उभी केली आहे. परदेशात बसलेल्या फहिमने मागील काही वर्षांपासून मुंबईतील व्यवसायिक, बिल्डर यांना खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपर येथील एका बिल्डरकडे फहिम मचमचने ५० लाख रुपयांची खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.

घाटकोपर पश्चिमेतील एका नामांकित बांधकाम व्यवसायिकाला गँगस्टर फहिम मचमच याने खंडणीसाठी धमकावल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली आहे. घाबरलेल्या बांधकाम व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्यात या बांधकाम व्यवसायिकाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील व्यावसायिकाला दाऊद गँगकडून धमकीचा फोन

तृणमूलच्या अत्याचारांविरोधात महिलांनीही ठोठावले कोर्टाचे दरवाजे

मुंबईतील इमारत कोसळण्याच्या घटनांसाठी अग्निशमन दलाला ३ हजार कॉल

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे. छोटा शकील याचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जाणारा फहिम मचमच याने मागील काही वर्षांपासून मुंबईत हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये फहिम मचमच याच्या चार गुंडांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. यामध्ये कुख्यात गुंड फजरू रहेमान खान याचा समावेश होता. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

दाऊद मचमचवर होता नाराज

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा मुलगा आणि दाऊदचा पुतण्या रिजवान कासकर याला मुंबई पोलिसांनी पैशांच्या वसुली प्रकरणी अटक केल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भडकला होता. गुन्हेगारी क्षेत्रापासून नवीन पिढीला दूर ठेवण्याचे दाऊदने ठरवले होते. मात्र फहिम मचमच याने रिजवान याला गुन्हेगारी क्षेत्रात आणले होते. फहिमच्या सांगण्यावरून रिजवान बेकायदेशीर वसुलीच्या धंद्यात आणले होते.

दाऊदच्या नाराजीनंतर फहिम मचमच याने स्वतःची वेगळी टोळी तयार करून मुंबईत सक्रिय झाला आहे. त्याने मुंबईतील व्यवसायिक,बिल्डर यांना आपले लक्ष केले आहे. मागील काही वर्षांपासून फहिम मचमच याने अनेक व्यवसायिक आणि बिल्डरांना खंडणीसाठी धमकीचे कॉल केले असल्याच्या तक्रारी मुंबईतील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा