विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राइव्ह सादर करून गिरीश महाजन यांना अडकविण्याचा कट कसा रचण्यात आला, याचे पुरावे दिल्यानंतर त्याची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी केली होती. पण सरकारने ती मान्य केली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपाने सभात्याग केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सीबीआयची मागणी पूर्ण होत नसल्याबद्दल सभात्याग करत असल्याचे जाहीर केले.
त्याआधी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही चौकशी सीआयडीमार्फत करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच याप्रकरणात व्हीडिओत दिसत असलेले वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले तसेच त्यांचा तो राजीनामा सरकारने स्वीकारला आहे.
फडणवीस यांनी सभात्याग केल्यावर बाहेर येऊन म्हणाले की, या पेनड्राइव्हमध्ये जे दिसते आहे ते घडले आहे. अनेक प्रकरणे घडली आहे. अशा परिस्थीतीत राज्याचे पोलिस चौकशी कसे करणार, त्यांच्यावर दबाव येणार. म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे द्याे अशी मागणी होती. वळसे पाटील यांना माहीत होते की, आपण चुकीचे उत्तर देतो आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाऊ आणि सीबीआयला गेली तर पर्दाफाश होईल. यासोबत लांबे यासंदर्भात क्लिप मी दिलेली आहे. मला वाटते की, अशाप्रकारे या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक दाखविली जाते त्यांना प्राधान्य दिले जाते. म्हणून अशा लोकांची नियुक्ती होते. दाऊदशी संबंधित लोकांच्या संदर्भात लोकांना विशेष प्रेम दिसते त्याचा पर्दाफाश आम्ही केला.
हे ही वाचा:
नाटोच्या इतर देशांना झेलेन्स्की यांनी दिला सतर्कतेचा इशारा
फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत
काश्मीर फाइल्स आणि गंडवणारा प्रपोगंडा
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात एक अधिकारी शहीद, जवान जखमी
फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, दिलीपरावांना २२ वर्षे पाहतो आहे पहिल्यांदा ते हतबल वाटले. हिटविकेटवर असतानाही नाईटवॉचमन सारखे खेळले. एनआयएने बॉम्बस्फोटाचला एफआयर नाही मनीलॉन्ड्रिंगचा आहे. त्याच्या तपासात हे बाहेर निघालेले आहे. प्रश्न एवढाच आहे की, हे माहित असताना सरदार शहावली खान आरोपी असताना, सलीम पटेल हा फ्रंटमॅन आहे. कमी भावात जमीन खरेदी करणे हे काही साधी गोष्ट नाही. या प्रकरणात कुणालाही पकडून जेलमध्ये टाकलेले नाही. पुरेसे पुरावे आल्यानंतर टाकले आहे. उच्च न्यायालयाचाही निकाल आहे. ट्रायल कोर्टात प्रायमा फेसी केस आहे. अनिल देशमुखांच्या बाबतीत एफआयर केला हायकोर्टाने केला. आदेश दिला म्हणून एफआयआर झाला.
फडणवीस म्हणाले की, या केसमध्ये गिरीश महाजनांना अडकविण्यासाठी काय करायचे याचा व्हीडिओ आहे तो. पुरावे तयार करणे हे सरकारी वकिलाचे काम आहे का? माझी अपेक्षा होती की, तुम्ही गांभीर्याने घ्याल. मी आठवण करून देतो की तुमच्या काळातही आवश्यकतेप्रमाणे टॅपिंग झाले. गोऱ्हे, नार्वेकरांचे झाले आहे. कोर्ट पाहील ते, पण मी त्याचे समर्थन करणार नाही. सरकार षडयंत्र करत असताना त्याचा व्हीडिओ दिल्यावर तुमच्या हाताखाली असलेल्या पोलिसांकडून चौकशी होईल याची अपेक्षा ठेवता येईल.