छोटा शकीलच्या भावावर खंडणीचा गुन्हा

छोटा शकीलच्या भावावर खंडणीचा गुन्हा

शनिवारी पोलिसांनी छोटा शकीलचा भाऊ अन्वरवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला. अन्वरसोबतच अजून दोन जणांविरुद्ध खंडणी विरोधी पथकात गुन्हा दाखल झाला आहे. पश्चिम उपनगरात पुनर्विकासाचे काम करणाऱ्या एका विकसकाने अन्वरविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक झाली असून अन्वर दोन दशकांपूर्वीच देश सोडून गेला असून तो परदेशात लपलेला आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंद झाली होती. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ओशिवरा येथील एका पुनर्विकास प्रकल्पात तडजोड करण्यासाठी अन्वरची मदत घेतल्याचं उघडकीस आले. पोलिसांनी अरबाज शेख आणि कमरान सय्यद या दोन आरोपींना अटक केली असून त्यांना १७ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींवर कलम ३८७, २०१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

राज्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न

अफगाणिस्तानात सत्तांतर होणार?

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ

आरोपी शेख हा पश्चिम उपनगरातील झोपडपट्टीमध्ये राहतो. त्याच्याकडे एका खोलीची कागदपत्रे होती. पण शेख याने विकसकाकडे पाच खोल्यांची मागणी केली. बाकी खोल्यांची कागदपत्र योग्य नसल्यामुळे विकसकने शेख याला अधिकाऱ्यांची भेट घेण्यास सांगितले. शेख याने हे सर्व प्रकरण सय्यदला सांगितले आणि नंतर विकसकला शेखला अधिकच्या खोल्या देण्यासंबंधी अन्वरचा फोन आला. १५ खंडणी प्रकरणातील गुन्हे आणि एक खून करण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची अन्वरच्या नावे नोंद आहे.

Exit mobile version