पंतप्रधान कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत फसवणूक केल्याची घटना घडल्याचे पुण्यातून समोर आले आहे. शासनाचे टेंडर मिळवून देतो असे म्हणत फसवणूक झाल्याची माहिती आहे. शिवाय आरोपी आणि फिर्यादी यांची भेट झाली होती. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणातील फिर्यादी आणि आरोपींची कुठल्यातरी कारणावरून ओळख झाली होती. यानंतर आरोपी कश्मीरा पवार यांनी फिर्यादींना त्या स्वतः पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. शासकीय टेंडर मिळवून देतो अशी बतावणी सुद्धा कश्मीराने केली. तसेच यासाठी ५० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विश्वास संपादित व्हावा म्हणून आरोपींनी फिर्यादीला थेट पुण्यातील विधान भवनात भेटण्यासाठी बोलावलं व त्यांच्या व्हॉट्सॲपवर शासकीय टेंडरचे बनावट कागदपत्र सुद्धा पाठवले. टेंडर मिळवल्यानंतर पैसे कमवता येतील या भावनेतून फिर्यादीला विश्वास बसला. टेंडर मिळवायचे असेल तर पैसे भरावे लागतील, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून रोख स्वरूपात तसेच आरटीजीएसद्वारे ५० लाख रुपये उकळले.
हे ही वाचा:
राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर मार्केट तेजीत; सेन्सेक्स ७७ हजार पार
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!
मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…
कालांतराने एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा टेंडर मिळत नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.