मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन

अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना असुरक्षित भागात सुरक्षा

मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन

मणिपूरमधील हिंसाचाराची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असून आता सुरक्षा दलांनी मणिपूरमधील डोंगराळ आणि खोऱ्यातील विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम राबवली आहे. पोलिसांनी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित केली असून असुरक्षित भागात त्यांना सुरक्षा देखील पुरवली आहे.

मणिपूर पोलिसांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुरक्षा दलांद्वारे डोंगराळ आणि खोऱ्यामधील जिल्ह्यातील सीमावर्ती आणि संवेदनशील भागात शोध मोहीम राबविण्यात आली असून अनेक ठिकाणी वर्चस्व घेण्यात आले आहे.” पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असुरक्षित ठिकाणी कडक सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी प्रदेशातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ९४ चौक्याही स्थापन केल्या आहेत.”

यापूर्वी मंगळवारी, राष्ट्रीय तपास संस्थेने गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार जिरीबाममधील अलीकडील हिंसाचारासह इतर दोन प्रकरणांसंदर्भात गुन्हा नोंदविला. दोषींवर त्वरीत गुन्हा दाखल करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांवर त्वरीत कृती करत, एनआयएने मणिपूरमधील अलीकडील हिंसाचाराशी संबंधित तीन मोठ्या प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा..

झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या

एअर इंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या

मानवी तस्करी प्रकरणी एनआयएकडून सहा राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापेमारी

दिल्लीत ईडीच्या पथकावर हल्ला, एक अधिकारी जखमी

एनआयएने सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी काही अज्ञात सशस्त्र अतिरेक्यांनी बोरोबेकरा पोलीस स्टेशन, तसेच जाकुराधोर करोंग येथील काही घरे आणि दुकाने यांच्या दिशेने गोळीबार केला आणि नंतर आग लावल्याची घटना घडली. बोरोबेकरा पीएसच्या पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी प्रत्युत्तर दिले, यामुळे जोरदार गोळीबार झाला. त्यानंतरच्या शोध मोहिमेमुळे दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version