34 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरक्राईमनामामहिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

महिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

Google News Follow

Related

गणेशाेत्सवात बॅनर लावण्यावरून एका महिलेला सार्वजनिकरित्या मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य मुंबईतील कामाठीपुरा भागात तिच्या दुकानासमोर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी खांब लावण्यास महिलेने आक्षेप घेतला, त्यामुळे दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. या मारहाणीचा सर्वच थरातून निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यामुळे या मारहाण प्रकरण मनसे कारवाई करणार की नाही असा प्रश्न विचारला जात हाेता. अखेर मारहाण करणाऱ्या विनाेद अरंगिल या कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये मनसेचे स्थानिक पदाधिकारी विनोद अरंगिल आणि पक्षाचे इतर दोन कार्यकर्ते एका मध्यमवयीन महिलेला थप्पड मारताना, धक्काबुक्की करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ समोर आल्यानंतर नागपाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी कलम ३२३, आणि ५०९ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली हाेती.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

या मारहाणीचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. मारहाणीमध्ये ही महिला जमिनीवर काेसळली हाेती. महिला नेत्या आणि संघटनांकडूनही या मारहाण व शिवीगाळ प्रकरणाचा निषेध करण्यात आला हाेता. त्यानंतर अरंगिले याने स्पष्टीकरण देताना, बॅनरसाठी खांब लावत असताना महिलेने राज ठाकरे यांच्या घरासमाेर बॅनर लावा असे म्हटल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली हाेती. महिलेशी पदाधिकाऱ्याने केलेले वर्तन हे चुकीचे आहे.

शिवाय पक्षाला महिलांबाबत कायम आदरच राहिला आहे असे म्हणतं, या पदाधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मनसे पक्षाला आणि पक्षातील प्रत्येक घटकाला महिलांबाबत आदर कायम आहे. त्यामुळे पक्षातीलच कोणी असे कृत्य करणे हे बरोबर नाही. त्यामुळे विनोद अरगिले यांना पदावरुन हटवल्याचे पत्र बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्ध केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा