28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाकोलकातामध्ये बेवारस बॅग तपासताना स्फोट

कोलकातामध्ये बेवारस बॅग तपासताना स्फोट

स्फोटात एक जण जखमी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या एस एन बॅनर्जी रोडवर शनिवार, १४ सप्टेंबर रोजी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे रस्त्यावर पडलेल्या बेवारस बॅगेला उचलायला गेलेला व्यक्ती बॅगेतील स्फोटकांच्या ब्लास्टमुळे जखमी झाला. कोलकाता येथे गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला एक बॅग पडली होती. या बॅगेत काय आहे हे पाहण्यासाठी एकाने ती बॅग उचलली असता या बॅगेत ठेवलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाल्याने ही व्यक्ती जखमी झाली. शनिवारी दुपारी १.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी या स्फोटावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “घटनेची छायाचित्रे माझ्यापर्यंत पोहोचली असून जड स्फोटकांशिवाय हे घडणे शक्य नव्हते, अन्यथा अशी घटना घडू शकली नसती. या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी आवश्यक आहे. पश्चिम बंगाल पोलिसांकडे अशा प्रकरणाचा तपास करण्याची क्षमता आहे असे मला वाटत नाही.” तसेच त्यांनी गृहमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांच्या अपयशाचाही पुनरुच्चार केला. आरोग्यमंत्री असतानाही ममता बॅनर्जी अयशस्वी झाल्या हे आरजी कर रुग्णालय घटनेने दाखवून दिले आहे आणि आता अशा घटना घडत आहेत.

हे ही वाचा:

पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले

कर्नाटकात ‘गणपती’ला पोलिस व्हॅनमध्ये कोंडले

गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात

डॅलसमध्ये पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डल्ला; हीच काँग्रेसची ‘लोकशाही’

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने एएनआय मीडियाला सांगितले की, “स्फोट झाला तेव्हा आम्ही जवळच उभे होतो. आम्ही ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि पाहिलं की जवळच एक माणूस पडला होता. या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर जखम झाली होती. स्फोटाचा आवाज खूप मोठा होता. पोलिसांनी तात्काळ येथे पोहोचून जखमींना रुग्णालयात नेले. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा