पंजाबमधील जालंधरमध्ये भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर स्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनेच्या वेळी माजी मंत्री मनोरंजन कालिया त्यांच्या घरात झोपले होते.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका आरोपीने ई-रिक्षातून खाली उतरून हातबॉम्ब काढला आणि तो माजी मंत्र्यांच्या घराच्या आत फेकला. त्यानंतर एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात माजी मंत्र्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. जालंधरचे पोलिस आयुक्त धनप्रीत कौर म्हणाले की, स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि तपास सुरू केला.
यासंदर्भात माहिती देताना मनोरंजन कालिया म्हणाले, स्फोट झाला तेव्हा मी झोपलो होतो. त्यावेळी मला असे वाटले कि हा ढगांचा गडगडाट आहे कि काय?, नंतर मला सांगण्यात आले की स्फोट झाला आहे, त्यानंतर मी माझ्या बंदूकधारी व्यक्तीला पोलिस ठाण्यात पाठवले. सीसीटीव्ही तपासण्यात आला. सीसीटीव्ही तपासात असे दिसून आले की एक माणूस ई-रिक्षातून आला, त्याने हँडग्रेनेडचा लीव्हर काढला घरावर फेकला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
हे ही वाचा :
तथाकथित बुद्धिवंत, पत्रकार मंगेशकर कुटुंबावर म्हणून जळतात
विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव
दरम्यान, तत्पूर्वी, १ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता पटियाला येथील बादशाहपूर पोलिस ठाण्यात मोठा स्फोट झाला होता. स्फोटामुळे पोलिस चौकीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. दुसरीकडे, पोलिसांनी ग्रेनेड हल्ल्याची शक्यता नाकारली आहे. एसएसपी डॉ. नानक सिंग म्हणाले की, चौकीच्या आजूबाजूच्या शेतात शोध मोहीम राबवण्यात आली परंतु स्फोटक पदार्थाचे किंवा इतर कोणत्याही वस्तूचे अवशेष सापडले नाहीत जे ग्रेनेड हल्ल्याचे संकेत देऊ शकतात. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.