पुणे: पोलीस अधिकारीच निघाला ड्रग्स तस्कर!

४५ कोटींच ड्रग्स जप्त

पुणे: पोलीस अधिकारीच निघाला ड्रग्स तस्कर!

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.ड्रग्स विक्री प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांकडूनच ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी आरोपी पोलिसाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते.या प्रकरणी नमामी झा नामक हॉटेल चालकाला पोलिसांनी अटक केली होती.मात्र, या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.आरोपी नमामी झा याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा अधिकारी विकास शेळके याचा हात असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

बारामतीमधील महा रोजगार मेळाव्याच्या मंचावर रंगला टाळाटाळीचा खेळ

केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

या प्रकरणी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारवाई करत आरोपी विकास शेळकेला अटक केली आहे.विशेष म्हणजे पोलिसांच्या पथकाकडून झाडाझडती दरम्यान आरोपी विकास शेळकेकडून तब्बल ४५ कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले आहे.पोलिसांकडून हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकास शेळकेची अधिक चौकशी केली असता त्याच्या मालकीच्या पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे.सध्या या प्रकरणाचा तपास आमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.पोलिसांनी आरोपी विकास शेळकेला ताब्यात घेतले असून या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Exit mobile version