कोलकाता पोलिसांनी जाधवपूर विद्यापीठात झालेल्या एका विद्यार्थ्याच्या अनैसर्गिक मृत्यूचे गूढ उकलले आहे. पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव स्वप्नदीप कुंडु असे होते. या प्रकरणी पोलिसांनी या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याचे नाव सौरव चौधरी आहे. हा आरोपी मुख्य वसतिगृहात राहत होता. त्याने सन २०२२ मध्येच गणितामध्ये एमएससीचे शिक्षण पूर्ण केले होते. १८ वर्षीय स्वप्नदीप कुंडू याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी चौधरीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
बुधवारी रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून स्वप्नदीपचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सौरव चौधरीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा आरोपी स्वप्नदीपला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता.
हे ही वाचा :
शासकीय रुग्णालयात निःशुल्क उपचार मिळणार
शिवाजीनगर-हिंजवडी-माण मेट्रो कामाला गती देण्याचे निर्देश
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक
बाल्कनीतून पडल्यानंतर स्वप्नदीपचा मृतदेह नग्नावस्थेत होता. सूत्रांनी सांगितल्यानुसार, स्वप्नदीप वारंवार ‘मी समलैंगिक नाही’ असे सांगत होता. हा सुगावा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. त्याच्या रूममेट्सची चौकशी केली. घटनेवेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिक तपास केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.