पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या

पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केलेल्या गोळीबार करुन, माजी एसपीओ फैयाज अहमद आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या गोळीबारात माजी पोलीस अधिकारी अहमद यांची मुलगीही गंभीर जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिरेक्यांच्या गोळीबारात झालेल्या मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. रात्री ११ च्या सुमारास हा गोळीबार झाला. या गंभीर हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकांनी परिसराला घेराव घालून, सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दहशतवादी अवंतीपुरा भागातील हरिपरिगावात घुसले. त्यांनी एसपीओ फयाज अहमद यांच्या घरात शिरुन अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये अहमद यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आधी पत्नी आणि नंतर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे माजी एसपीओ फैयाज अहमद यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अहमद यांची पत्नी राजा बानो (४८) आणि मुलगी राफिया जान (२५) यांचा समावेश आहे. राफिया जानची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यामुळे तिच्यावर श्रीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु होते.

हे ही वाचा:

नव्या निर्बंधांविरुद्ध व्यापारी ‘या’ शहरांमध्ये आक्रमक

ओवैसी उत्तर प्रदेशात शंभर जागांवर निवडणूका लढवणार

कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७६ दिवसांनी हजाराच्या आत

पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री

यापूर्वी रविवारीही जम्म विमानतळावरील एअरफोर्स स्टेशनवर स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन पाडले होते. त्यावेळी ६ मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले होते. यामध्ये वायूदलाचे दोन जवान जखमी झाले होते. हा सुद्धा दहशतवादी हल्लाच असल्याचं जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं होतं. पोलीस, वायूदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहेत.

Exit mobile version