कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता या आरोपांखाली विशेष न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या आरोपांचा तपास करताना सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले की, आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष हे मोठ्या रॅकेटचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी प्राचार्य संजय घोष हे एका मोठ्या रॅकेटचा भाग होते आणि याचा पदार्फाश करणे आवश्यक होते, असं सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितलं आहे. रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. याप्रकरणी संजय घोषला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. संदीप घोषला सोमवारी भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच, घोषचा सुरक्षा रक्षक अफसर अली खान (वय ४४ वर्षे), माँ तारा ट्रेडर्सचा मालक बिप्लब सिंघा (वय ५२ वर्षे), हावडा येथील मेडिकल मालक सुमन हाजरा (वय ४६ वर्षे) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनाही १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.
सीबीआयचे वकील रामबाबू कनोजिया यांनी न्यायालयाला सांगितलं की, हे चारही आरोपी या मोठ्या रॅकेटचा भाग होते. यात आणखी लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे एक मोठं रॅकेट आहे, याची चौकशी करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा
रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४१ नागरिक ठार
प. बंगालमध्ये बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने मंजूर
ती सुरतेची लूट नव्हती…पंतप्रधान मोदींचे ते भाषण व्हायरल!
सीबीआयने चौघांवरही सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेकायदा पैसे घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, फसवणूकविरोधातील कलम ४२०, गुन्हेगारी कट रचने कलम १२०, बनावट दस्ताऐवज बनवणे कलम ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयचे वकील कनोजिया यांनी या गुन्ह्याची मोठी व्याप्ती असल्याचं म्हटलं आहे. सीबीआयने त्याला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. परंतु, डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणीही त्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.