परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती

परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मात्र ते भारताबाहेर असल्याची चर्चा सुरू होती. पण अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचे म्हटले होते. पण ‘एबीपी माझा’ला त्यांनी सांगितले की, ते चंदीगडमध्ये आहेत. लवकरच ते पुढील चौकशीसाठी मुंबईत येऊ शकतील. त्यांना अनेक समन्स पाठविल्यानंतरही ते हजर राहण्यास तयार नव्हते. ते बेल्जियमला गेल्याचेही सांगण्यात येत होते. अखेर ते भारतातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप परमबीर यांनी केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.

तसेच परमबीर सिंग यांचे वकील पुनीत बाली यांनी परमबीर हे भारतात आहेत असे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते ४८ तासात समोर येतील, असेही वकिलांनी सांगितले आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणीही करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंग समोर येत नाहीत; ते फरार नाहीत, असा दावा परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता.

 

हे ही वाचा:

विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

‘स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ पुस्तकातून दिसतो पूर्व भारताचा नजारा

टोमॅटोने गाठली शंभरी!

नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. देशमुख खंडणी वसूल करण्यासाठी वाझेचा वापर करत होते, असा आरोपही करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते. तर सचिन वाझे सध्या कारागृहात आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग समोर आल्यास अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version