25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामाआत्मघाती बॉम्बने केले पत्नीला ठार!

आत्मघाती बॉम्बने केले पत्नीला ठार!

Google News Follow

Related

दक्षिण मिझोरामच्या लुंगलेई जिल्ह्यात एका ६२ वर्षीय व्यक्तीने आपल्या विभक्त पत्नीला आत्मघाती बॉम्बने ठार मारल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑक्टोबर) १२.१५ च्या सुमारास घडल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रेक्स वांचहाँग यांनी सांगितले. रोहमिंग्लियाना हा पीडितेचा दुसरा पती होता. तलांगथिअनघालीमी (६१) आणि रोहमिंग्लियाना हे गेल्या वर्षभरातच वेगळे झाले होते, अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे.

रोहमिंग्लियाना हा पहिले तलांगथिअनघालीमीच्या शेजारी बसला आणि त्याने लोकल सिगारेट पेटवले. पुढील काही क्षणातच रोहमिंग्लियानने ताप आल्याचे आणि चक्कर येत असल्याचे सांगत शेजारी बसलेल्या तलांगथिअनघालीमीच्या अंगावर वजन टाकले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ही घटना लुंगलेई जिल्ह्याच्या हाय पॉवर कमिटी कार्यालयाच्या समोर घडली. तलांगथिअनघालीमी आपल्या पहिल्या लग्नानंतर झालेल्या मुलीसोबत भाजी विकत होती.

हे ही वाचा:

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

कोरोना काळात मुंबईकरांमध्ये वाढला मानसिक ताण…

‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’

कचरावेचक झाले गायब आणि कचरा दिसू लागला

वांचहाँग यांच्या मते स्फोटासाठी जिलेटीनचा वापर करण्यात आला होता. दोघांनाही जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह लुंगलेईपासून सुमारे ७३ किलोमीटर दूर असलेल्या थिल्टलंग गावात पाठविण्यात आले. मुलीला या घटनेत कोणतीही इजा झालेली नाही. या जोडप्याला दोन मुलगे असून रोहमिंग्लियान हिंसक होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा