प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी आली आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत ते जखमी झाल्याचा व्हीडिओ समोर आला. त्यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागल्याचे दिसते आहे. डोक्याला मार लागल्याने पांढरी पट्टी बांधणयात आली होती.
अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यात!
मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात
दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!
या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटली आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला, असे म्हटले जात आहे. त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपकडून अनिल देशमुख यांचा हा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळावी यासाठी स्वत:वर हल्ला घडवून आणला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांचा हल्ल्यानतंरचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत अनिल देशमुख गाडीत जखमी अवस्थेत दिसत आहेत. त्यांचं डोकं फुटल्याने, डोक्यातून रक्त येत असल्याने अनिल देशमुखांच्या डोक्याला रुमाल गुंडाळलेला बघायला मिळाला. या घटनेमागे नेमकं कोण आहे? ते अद्याप समोर आलेलं नाही. पण भाजपकडून अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी स्वत:च्या लोकांकडून दगडफेक करायला लावली असू शकते, असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरम्यान, या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.