कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एका कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अशा दोघांनाही तलवारीने ठार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली.
पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, हे दोन्ही मृत्यू झालेले अधिकारी त्यावेळी कार्यालयातच होते. त्यावेळीच त्यांच्यावर हल्ला झाला. या दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले पण वाटेतच त्यांना मृत्यू झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा हा माजी कर्मचारी होता. तंत्रज्ञान क्षेत्रातील तो व्यवसाय करत असे. सदर दोन्ही अधिकारी त्याच्या व्यवसायात हस्तक्षेप करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर
देशभरात अतिवृष्टीमुळे एका दिवसात ५६ जणांनी गमावला प्राण
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा
मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती
सदर आरोपी फरार आहे. प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली की, आरोपी फेलिक्स हा एअरोनिक्स कंपनीतील माजी कर्मचारी होता. नोकरी सोडल्यानंतर त्याने आपला व्यवसाय सुरू केला. एअरोनिक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या फणिंद्र यांच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग होता. फणिंद्र हे या आरोपीच्या कामाबद्दल सातत्याने डिवचत असत. मंगळवारी संध्याकाळी फेलिक्स सुरा आणि तलवार घेऊन कार्यालयात आला. तिथे त्याने फणिंद्र आणि सीईओ विनू कुमार यांची हत्या केली आणि तो फरार झाला.
ही घटना घडल्यावर कार्यालयात हाहाकार उडाला. फणिंद्र आणि विनू कुमार यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी फेलिक्सचा शोध सुरू आहे.