मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि परबीर सिंह यांची सीबीआयने सोमवार, १८ जुलै रोजी दिल्लीत पाच ते सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही चौकशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी वसुली प्रकरणी करण्यात आली.
संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त असताना दबाव आणला होता असा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. याआधीही ईडीने देखील संजय पांडे यांची आठ तास चौकशी केली होती. ही चौकशी पांडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील एकूण १८ कोटी रुपयांच्या विविध व्यवहारांबाबत होती.
हे ही वाचा:
गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन
संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?
सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला घातला गंडा!
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.