झाम्बियाच्या माजी सैनिकाला ड्रग्स सह अटक

झाम्बियाच्या माजी सैनिकाला ड्रग्स सह अटक

मुंबईत नार्कोटिक्स प्रतिबंध विभागाकडून ड्रग्स माफियांना तस्करीच्या मार्फत मदत करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. हा इसम झाम्बिया देशाचा एक माजी सैनिक आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर या इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याने ट्रॉली बॅगेत दडवून आणलेले २६ कोटी रुपये किमतीचे उच्च प्रतीचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

केनिथ मुलोवाला असे या माजी सैनिकाचे नाव असून त्याने ट्रॉली बॅगेत हेरॉईन लपवून आणले होते. अटकेनंतर या इसमाला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे. झाम्बिया देशातील एकी माजी सैनिक ड्रग्सची तस्करी करणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली. एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे यांना ही माहिती मिळाली होती. हे माहिती मिळताच या सैनिकाला अटक करण्याची योजना वानखेडे यांनी आखली. मागील दोन दिवसांपासून वानखेडे यांचे पथक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानातळावर तळ ठोकून होते. शनिवारी सकाळी एक जण संशयित वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या ट्रॉली बॅगेत चार किलो उच्च प्रतीचे हेरॉईन सापडले.

हे ही वाचा:

गॅस शेगडी मेकॅनिकला ४ लाखाच्या अफिमसह अटक

करार आणि करारी

शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच

कोविड रूग्णालयात उपचार घ्यायला पॉझिटिव्ह रिपोर्ट बंधनकारक नाही

अधिक चौकशीत त्याचे नाव केनिथ मुलोवाला असल्याचे समजले. तसेच तो झाम्बियाचा माजी सैनिक असल्याची माहिती त्याने एनसीबीला दिली. केनेथ मुलावाला पैसे कमवण्यासाठी ड्रग्स माफियांकडून अमली पदार्थ घेऊन इतर देशात त्याची तस्करी करत होता. या तस्करीतून त्याची लाखो रुपयाची कमाई होत होती.

Exit mobile version