प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

पोलिंग एजंटना मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली म्हणून संताप

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

देशभरात ५७ जागांसाठी मतदान पार पाडत असून हा शेवटचा टप्पा आहे. अशातच लोकसभा निवडणुकीदरम्यान शनिवार, १ जून रोजी सकाळी पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. संतप्त जमावाने पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा येथील कुलताली येथील बूथ क्रमांक ४० आणि ४१ येथील मतदान केंद्रात प्रवेश केला आणि ईव्हीएम मशीन थेट तलावात फेकून दिले, अशी बातमी पीटीआयने दिली आहे.

काही पोलिंग एजंटना मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने ही घटना घडली. प्रत्युत्तर म्हणून, संतप्त जमावाने मतदान केंद्रात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी ईव्हीएम व्हीव्हीपीएटी हिसकावले आणि तलावात फेकले. पश्चिम बंगालच्या बेनीमाधवपूर येथील जयनगर मतदारसंघातल्या १२९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर काही लोकांनी हल्ला केला. या मतदान केंद्रावर तोडफोड करत तेथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन जवळच्याच तलावात फेकून देण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर संबंधित मतदान केंद्रावर नवीन व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन बसवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

यावेळी पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत चांगले मतदान झाले. मात्र, पहिल्या टप्प्यापासून पश्चिम बंगालमधून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच तृणमूल काँग्रेसने दावा केला होता की, अलीपुरद्वार तुफानगंज-२ ब्लॉकमधील बारोकोदली-१ ग्रामपंचायतीच्या हरिरहाट भागात टीएमसीच्या तात्पुरत्या पक्ष कार्यालयाला भाजपा समर्थकांनी आग लावली होती.

हे ही वाचा:

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

दरम्यान सातव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना रणौत हे निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी मतदान होत आहे.

Exit mobile version