एरोटीका म्हणजे पॉर्न नाही…माझे पती निर्दोष

एरोटीका म्हणजे पॉर्न नाही…माझे पती निर्दोष

पती राज कुंद्रा संकटात असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. शिल्पा शेट्टी हीने राज कुंद्रा याचे समर्थन करताना, ‘माझे पती निर्दोष आहेत’ असा दावा केल्याचे समजते. तर ‘एरोटीका म्हणजे पॉर्न नाही’ असा जबाब शिल्पा शेट्टी हिने पोलिसांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा याची केस देशभर चांगलीच गाजत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफीक कंटेंट बनवण्याच्या व्यवसायात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर त्यासाठी त्याला अटकही करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबई पोलीसांनी या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा जबाब नोंदवला. शिल्पा शेट्टी हिने आपल्या जबाबात एरोटीका आणि पॉर्नोग्राफी यात फरक असल्याचे दाखवून देत, एरोटीका म्हणजे पॉर्न नाही असा खुलासा केल्याचे समजते.

हे ही वाचा:

मालाडमधील त्या रहिवाशांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

मीराबाई चानूने रौप्य पदक उचलले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

यावेळी शेट्टी हिने हॉटशॉट्स या मोबाईल ॲप वर नेमका कोणत्या प्रकारचा कंन्टेन्ट जातो याबद्दल आपल्याला नेमके माहीत नसल्याचे सांगितले आहे. तर लंडन स्थित प्रदीप बक्षी हा या ॲपशी संबंधित असल्याचे शिल्पाने सांगितल्याचे समजते.

शुक्रवारी एकीकडे शिल्पा शेट्टीची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे तिचा पती राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत २७ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांनी या प्रकरणाशी संबंधित ४८ टीबी इतका कंन्टेन्ट जप्त केला असून यामध्ये बहुतांशी अश्लील फोटो आणि चित्रफिती आहेत. पोलिसांचा संशय आहे की या पाॅर्नोग्राफीक कंटेन्टच्या विक्रीतून येणारा पैसा हा ऑनलाइन बेटिंगमध्ये वापरला जात होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित साडेसात कोटी इतकी संपत्ती जप्त केली आहे.

Exit mobile version