एमआयडीसीतील गुंडांच्या ‘उद्योगां’नी ठाणे ग्रासले

एमआयडीसीतील गुंडांच्या ‘उद्योगां’नी ठाणे ग्रासले

गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. दादागिरी करणे, मारहाण करणे अशा अनेक घटनांचा सामना राज्यातील जवळपास सर्वच एमआयडीसीमधील उद्योजक करत आहेत. ठाणे परिसरात असे गुंड प्रवृत्तीचे लोक, टोळ्या, संघटना यांच्यावर बंदी आणण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशने (टिसा) ठाण्याचे पोलीस आयुक्त जयाजीत सिंह यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये दोन मारहाणीच्या घटना घडल्यापासून उद्योजकांच्या या मागणीला जोर आला आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून उद्योगांची अवस्था वाईट आहे. निर्बंध शिथिल होत असले तरी उद्योग व्यवसाय मार्गावर यायला बराच काळ लागणार आहे. या परिस्थितीत गुंडांकडून हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील उद्योजक त्रासले आहेत, असे ‘टिसा’चे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

व्वा रे व्वा! तुम्ही बोलाल ती ठाकरे शैली आणि दुसरा कुणी बोलला की जीभ घसरली!

शिवडी बीडीडी चाळीतील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे महाराष्ट्रात खळबळ

अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण

उद्योगांविरुद्ध माथाडी आणि इतर संघटनांच्या नावाने सरकारी कार्यालयांत तक्रारी दाखल करणे, माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून उद्योजकास वेठीस धरणे तसेच भंगार काढण्यावरूनही अनेकदा दादागिरी केली जाते. नियम व कायदे यांना जुगारून हे स्थानिक गावगुंड असे कृत्य कसे करतात, असा प्रश्न ‘टिसा’ने उपस्थित केला आहे.

एमआयडीसी परिसरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. नुकतीच आनंदनगर एमआयडीसीमधील दोन कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. पण या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

Exit mobile version