मोदी सरकारचे मागील १० वर्षीय आणि यंदाच्या तिसऱ्या कार्यकाळात चालू असलेले कामकाज पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासह परदेशातही कौतुक केले जात आहे. यंदाचे युग हे सोशल मिडियाचे असून अनेक जण आपले मत, भूमिका, पाठींबा व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. दरम्यान, सोशल मिडीयाच्या पोस्टवरून उत्तर प्रदेशाच्या रामपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने काही मुस्लीम हल्लेखोरांनी तीन हिंदू तरुणांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि इस्लामिक नारेबाजी वदवून घेतल्याचे समोर आले आहे. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरच्या मसावासी भागात हिंदू धर्माचा प्रचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात पोस्ट फेसबुकवर प्रसिद्ध केल्यामुळे तीन तरुणांची अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. घोसीपुरा-पट्टिकालनमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. चंचल दिवाकर, प्रद्युम्न दिवाकर आणि सोनू दिवाकर अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा :
भारताची ‘पॉवर’; जपानला टाकले मागे
पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील तुपाचीही होणार चाचणी!
भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये
ज्या भ्रष्ट व्यक्तीला तुरुंगात टाकले त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी होते हे अमान्य
तिघांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी गावातील कट्टरपंथीयांनी तिघांना धमकी दिली होती. त्यानंतर मुस्लिम हल्लेखोरांनी सुनियोजित कट रचून तिघांनाही कारमधून पळवून नेले, मारहाण केली, इस्लामिक घोषणा देण्यास भाग पाडले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिघांना महामार्गावर गाडीतून फेकून दिले. चौकीचे प्रभारी मनोज मिश्रा यांनी सांगितले की, तक्रारीवरून पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई येईल.